Page-bg
Logo-left
MainPage_top_text
Logo_new
Verticle-bar

इतिहास

Content-top-design

           खंडेराय , खंडोबा अर्थात मार्तंड भैरव , मार्तंड मल्हारी हा शंकराचा अवतार आहे . हा अवतार शंकराने केव्हा आणि कशासाठी घेतला याची माहिती आम्ही आपल्याला अल्पशा शब्दात करून देत आहोत.

           फार पूर्वी श्री विष्णूने मधु आणि कैटभ या दोन राक्षसांचा वध केला होता . त्या दोघांच्या रक्ता पासून दोन कीटक निर्माण झाले, आणि पुढे त्याच दोन कीटकांचे मणी आणि मल्ल या दोन राक्षसांत रुपांतर झाले. पुढे हे दोन राक्षस एवढे मातले, एवढे प्रबळ झाले कि त्यांना प्रत्यक्ष देवही भिऊ लागले. ऋषी मुनी आणि ब्राम्हणांचे तर त्यांनी जगणेच असहाय्य केले होते . तेव्हा सर्व ऋषीमुनी आणि देवांनी भोलेनाथ, महादेव म्हणजेच शंकर भगवान यांच्याकडे धाव घेतली व त्यांनी शंकराला सविस्तर कथन केले. तेव्हा शंकराने त्यांना वचन दिले की मी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दोघांचा नाश करीन, तो पर्यंत तुम्ही लवथळ येथे राहावे, तेथे तुम्हाला कोणते ही भय राहणार नाही.

           वचन दिल्याप्रमाणे पुढे यथावकाश पणे मार्गशीर्ष शुध्द षष्ठी या दिवशी शंकराने मार्तंड भैरव हा अवतार धारण केला आणि मणी मल्ल दैत्यांचा संहार करून दिलेले वचन पूर्ण केले हा दिवस म्हणजेच चंपाषष्ठी होय.

Content-bottom-design