Page-bg
Logo-left
MainPage_top_text
Logo_new
Verticle-bar

आम्ही कोण

Content-top-design

          जय मल्हार भक्ती संगमाची निर्मिती कशी झाली याची माहिती थोडक्यात आम्ही आपणाला देत आहोत. ही माहिती या भक्ती संगमाचे संस्थापक , संचालक तसेच सर्वेसर्वा श्री शाम मोडक (भाई) हे स्वतः त्यांच्या अनुभावासाहित आपल्याला सांगत आहेत.

          प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. त्याच प्रमाणे भक्ती हाही एक छंदच आहे, असाच मलाही मल्हारी च्या भक्तीचा छंद आहे. मल्हारीची भक्ती म्हणजेच खंडेरायाची भक्ती करीत असताना पुष्कळ लोक माझ्या सानिध्यात आले, आणि तेही मल्हारी भक्त झाले. हळूहळू भक्तीचा मळा फुलू लागला, भक्तांचा तांडा वाढू लागला, नुसता तांडा वाढत नव्हता, तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात मल्हारी विराजमान झाला होता. पुढे हळूहळू भक्ती मार्गाचे अनेक उपक्रम होऊ लागले. उदा: प्रत्येक पौंर्णिमेला पौर्णिमा उत्सव, भजन , नामस्मरण, चंपाषष्ठी उत्सव, प्रत्येक सोमवतीला जेजुरीची मल्हारवारी इत्यादी कार्यक्रम हे भक्त मोठ्या उत्साहाने करू लागले. अर्थातच, या सर्व भक्तांनी मिळूनच जय मल्हार भक्ती संगम स्थापन केले आहे. निस्वार्थी मनाने जय मल्हार भक्ती संगमाची कामे भक्त करीत आहेत. प्रत्येक पौंर्णिमेला नामस्मरणासाठी व भजनासाठी नियमित येतात.

          भक्ती भावाने ओतप्रोत असलेले हे जय मल्हार भक्ती संगम आपलेही स्वागत करीत आहे. या जय मल्हार भक्ती संगमाची ओळख आता पर्यंत जेजुरी , पाली , निमगाव, कोरठण, अणदूर, सातारे, शेगूड, नळदुर्ग, देवगड, कणकवली येथ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. आता असे वाटू लागले आहे की, खंडेरायाची पूजा, भक्ती ही साऱ्या जगाला दिसावी, कळावी आणि खंडेरायाचे भक्त जगाच्या पाठीवर कोठेही असले तरी त्यांना तेथेच देवाचे दर्शन व्हावे हीच ईच्छा मनात धरून जय मल्हार भक्ती संगम या माध्यमातून हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

          सदर भक्ती संगम हे कायदेशीररित्या महाराष्ट्र राज्य १५८६ / २०१२ जी. बी. बी. एस. डी. (मुंबई) या क्रमांकानुसार नोंदणीकृत आहे.

Content-bottom-design