Page-bg
Logo-left
MainPage_top_text
Logo_new
G1
Verticle-bar
Content-top-design

जेजुरी गडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नानापरिची रचना रचिली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥

      खंडोबा हे महाराष्ट्रा मधील असंख्य जाती जमातीच्या घराण्याचे  व कुळांचे लाडके कुलदैवत आहे. त्याच प्रमाणे आमचेही ते कुलदैवत आहे, आणि म्हणूनच आम्ही नेहमी त्याच्या दर्शनासाठी जेजुरी व खंडोबाच्या इतर स्थानी जात असतो.
      महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात मिळून बारा ठिकाणी खंडोबाची स्थाने आहेत. सर्व प्रथम आम्ही जेजुरी पहिले.
      जेजुरी हे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असणारे खंडोबाचे मुख्य स्थान म्हणजे साक्षात देवाची राजधानी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात असणाऱ्या सात स्थानांपैकी जेजुरी हे महाराष्ट्रातील खंडोबाचे मुख्य स्थान आहे. येथे खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची नेहमीच गर्दी असते. वर्षाच्या ३६० दिवसांपैकी केव्हाही गेलो तरी दर्शनासाठी भक्तांची झुंबडच उडालेली असते. येथे अनेक जाती व जमातींचे लोक पहावयास मिळतात. ब्राम्हणांपासून ते शुद्रा पर्यंत खंडोबाचे सारे भक्त येथे एकत्र दिसतात. देवाच्या द्वारी भेदभाव नसतो, उच्च निच हा फरक नसतो हे येथे पहावयास मिळते. दर्शनासाठी येणारे सारे भक्त खंडोबाच्या दरबारी येताना आपल्या बरोबर भंडारा (हळद) आणि खोबऱ्याच्या वाट्या घेऊन येतात. खोबऱ्याचे तुकडे व भंडारा उधळून "येळकोट येळकोट जय मल्हार" "सदानंदाचा येळकोट" असे गर्जून आपला भक्ती भाव खंडोबा प्रती प्रकट करतात. अशा या उधळलेल्या भंडारयाने संपूर्ण जेजुरी गड खालपासून वरपर्यंत आणि गडाखालील संपूर्ण परीसर हा पिवळा झालेला दिसतो म्हणूनच तर भक्त म्हणतात देवा तुझी सोन्याची जेजुरी.
      आमचे हे संकेतस्थळ नियमित खंडोबाचे वास्तव्य असणाऱ्या अनेक स्थानाचे दर्शन घडविण्यासाठी आणि खंडोबाचे भक्त, उपासक व अभ्यासक यांना या दैवताची माहिती पुरविण्यासाठी सदैव तत्पर राहील. आमचे हे संकेतस्थळ आपल्यासाठी उपयुक्त ठरेल हिच अपेक्षा बाळगुन आम्ही हे संकेतस्थळ अधिकाधिक उच्च शिखरावर नेण्याचा अवश्य प्रयत्न करू.
धन्यवाद !
Content-bottom-design